पुणे दि.३१(punetoday9news):- प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे या कार्यालयात लवकरच चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

वाहनांची नविन मालिका चालू होण्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते व त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो व ब-याचवेळा नागरीकांनाही याचा त्रास होतो. नागरिकांचा होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळावा, यासाठी ज्या चारचाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरुन हवे असतील त्यांनी दि. 4 जानेवारी 2021 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जांमध्ये कार्यालयाच्या नविन नोंदणी विभागात डीडी, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वत: जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकारजमा होईल. कोणतीही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी, कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही.
आकर्षक तसेच पसंतीच्या क्रमांकासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज तसेच प्रतिनिधी येणार असल्यास प्रतिनिधीचे प्राधिकारपत्र याचा नमुना कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये उपलब्ध असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिदधी पत्रकान्वये कळविले आहे.

Comments are closed

error: Content is protected !!