सांगवी,दि. १(punetoday9news):- फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष नगरसेवक संतोष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज १ जानेवारी निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी येथे भिमाकोरेगाव येथील शौर्य विजयस्तंभाची प्रतिकृती उभारून शौर्य विजयस्तंभाला अभिवादन करण्यात आले .

 

याप्रसंगी नगरसेवक संतोष कांबळे, संजय जगताप(अध्यक्ष, गणेश सहकारी बँक), बंडोपंत शेळके(अध्यक्ष,सांगवी जेष्ठ नागरीक संघ), दयानंद चव्हाण(बामसेफ,जेष्ठ कार्यकर्ते), राजेंद्र जमदाडे , सुर्यकांत वराडकर, ॲड. वसंत कांबळे, राहुल विधाटे, अमित बाराथे, विक्रम कदम उपस्थित होते.





सुर्यकांत वराडकर यांनी प्रस्ताविक केले. दयानंद चव्हाण यांनी मनोगत मांडले. ॲड. वसंत कांबळे यांनी सर्वांचे आभार मानून भिमाकोरेगावचा इतिहास उपस्थित जनसमुदायला सांगितला.

Comments are closed

error: Content is protected !!