मुंबई,दि.२(punetoday9news):- शेअर ट्रेडिंग मध्ये फेरफार केल्याच्या आरोप ठेवत प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी, यांना सेबीने 40 कोटींचा दंड ठोठावला आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीला 25 तर मुकेश अंबानी यांना 15 कोटींचा दंड भरावा लागणार आहे.
रिलायन्स पेट्रोलियमच्या शेअर ट्रेडिंग संबंधीत ही फेरफार झाली आहे. नवी मुंबई सेझ लिमिटेडला 20 कोटी आणि मुंबई सेझ लिमिटेडला 10 कोटींचा दंड देखील भरावा लागणार आहे.
रिलायन्स पेट्रोलियम ही स्वतंत्र लिस्टेड कंपनी होती. मार्च 2007 मध्ये रिलायन्स पेट्रोलियम चे 4.1% शेअर्स विकण्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीज कडून करण्यात आली. कंपनीचे भाव गडगडू लागल्यानंतर नोव्हेंबर 2007 मध्ये रिलायन्स पेट्रोलियम च्या शेअर खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यात आले होते. शेअरचे भाव प्रभावित करण्यासाठी हे व्यवहार चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचे सेबीचे म्हणणे आहे.
अशा पद्धतीने व्यवहार केल्या गेल्याने शेअर बाजारावरील गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होईल आणि त्यामुळे भविष्यात नुकसान होऊ शकते असे सेबीचे म्हणणे आहे.
Comments are closed