पुणे,दि.४(punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपी किरण आणि जखमी अभिषेक हे दोघे मित्र असुन अभिषेकची गर्लफ्रेंड ही आरोपी किरणची मानलेली बहीण आहे.
जखमी अभिषेक आणि आरोपी किरण हे दोघे एकाच दुचाकीवरून शुक्रवारी इंद्रायणी नगर येथून बालाजी नगरकडे जात होते. भोसरी टेल्को रोडवर येताच किरणने लघु शंका आल्याचे सांगून अभिषेकला दुचाकी थांबवण्यास सांगितले.
धावत्या दुचाकीचा वेग काही प्रमाणात कमी होताच पाठीमागे बसलेल्या किरणने कटरने अभिषेकच्या गळ्यावर वार करून मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर धावत्या दुचाकीवरून उडी घेऊन आरोपी किरण घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अभिषेक रिक्षाच्या मदतीने रुग्णालयात धाव घेतली. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
Comments are closed