पिंपळे गुरव, दि.४(punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य व सामाजिक कार्यकर्त्या आदिती निकम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवले. 




गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना पुस्तके देण्यात आली. लॉकडाऊन मुळे वस्ती शाळा बंद असल्या कारणाने ही मुले शिक्षणापासून कित्येक महिने दूर आहेत त्यामुळे पुस्तके मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला . त्याचबरोबर या वंचित मुलांना कपडे व व खाऊ वाटप करत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
सावित्रीबाई फुले यांची विचार सरणी अंमलात आणत शिक्षण हे जीवनातील महत्त्वाचे मूल्य असून प्रत्येक तळागाळातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे अशी भावना आदिती निकम यांनी व्यक्त केली.




यावेळी अनिल मुळे, श्रावणी कारंडे उपस्थित होते.

Comments are closed

error: Content is protected !!