पिंपळे गुरव,दि ५ (punetoday9news) :- पिंपरी चिंचवड मधील पिंपळे गुरव येथे सृष्टी चौक दरम्यान डिसेंबर महिन्यातही येथे भटक्या श्वानाला चौथ्या मजल्यावरून फेकून देण्यात आले होते. यात त्याचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. तर याच परिसरात दरवाजामध्ये बसतो म्हणून गरम पाणी टाकून मारल्याचाही प्रकार घडलेला आहे . ही घटना ताजी असताना आता श्वानांना जाळून व विषप्रयोग करून मारण्यात आल्याचे समोर आल्याने माणुसकीला लाजिरवाणा असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या श्वानांच्या जीवनाचे शत्रू बनून अज्ञात आरोपींना काय साध्य करायचे आहे ? असा प्रश्न नागरिक श्वानप्रेमी उपस्थित करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार , दोन श्वानांना जाणीवपूर्वक पेट्रोल टाकून जाळण्यात आले असून ही घटना पिंपळे गुरव परिसरात घडली आहे. १० ते १२ श्वानांसह पिलांचा विषबाधेमुळे संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी श्वान प्रेमी कुणाल यांनी पोलिसात धाव घेतली आहे. गंभीर बाब म्हणजे, मादीच्या सहा पिल्लांचा देखील मृत्यू झाल्याचा संशय प्राणिप्रेमींना आहे.
प्राणी प्रेमी कुणाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव परिसरतील शिवनेरी गल्लीमध्ये दोन श्वानांना पेट्रोल टाकून जाळण्यात आले असून इतर १२ भटक्या श्वानांचा विषबाधा होऊन संशयस्पद मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी घडली असून आज पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे. रविवारी आणि आज एकूण १२ श्वानांचा मृत्यू झाला आहे. त्यात दोन श्वानांना पोत्यात टाकून जाळण्यात आले आहे.
याचा तपास होऊन त्या नराधम व्यक्तीला शिक्षा होणे महत्वाचे असल्याचे मत प्राणी प्रेमींनी व्यक्त केले आहे.
Comments are closed