पुणे,दि.५(punetoday9news):- जिल्हयातील सर्व ऐतिहासिक वास्तु,किल्ले, स्मारके, संग्रहालये कोविड 19 चे संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन खुले करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
पुरतत्यव विभागाकडील पत्रानुसार कोविड१९ प्रादुर्भावाच्या अनुषंगाने ऐतिहासिक वास्तु, किल्ले, स्मारके, संग्रालये दि.३१ मार्च पासुन बंद होते. पुणे जिल्हयात विविध ऐतिहासिक वास्तुचा वारसा लाभलेला आहे. या ठिकाणी दरवर्षी मोठया प्रमाणात दुर्गप्रेमी,पर्यटक भेटी देत असतात. सदर पर्यटकांमुळे मोठ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. कोविड १९ विषाणुच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्हयातील ऐतिहासिक वास्तु, दुर्ग, किल्ले, स्मारके, संग्रालये पर्यटकांसाठी , नागरिकांसाठी खुले करण्याची सातत्याने मागणी केली जात होती.
जिल्हयातील सर्व ऐतिहासिक वास्तु,किल्ले, स्मारके, संग्रहालये कोविड १९ चे संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन खुले करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
याठिकाणी मानक कार्यप्रणालीचा अवंलब करणे बंधनकारक असणार आहे. आवश्यक शारिरिक अंतर बाळगणे, मास्कचा वापर करणे, वेळोवेळी हात स्वच्छ करणे बंधनकारक असणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास संबंधिताविरुध्द कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.
Comments are closed