सांगवी,दि.६(punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी येथे पत्रकार दिनाच्या निमित्ताने फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष नगरसेवक संतोष कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आज दि.६ रोजी राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून जेष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी सांगवी- नवी सांगवी- पिंपळे गुरव या पंचक्रोशीतील मान्यवर पत्रकार प्रकाश जमाले(संपादक,क्रांतीप्रकाश मासिक), रमेश मोरे(सकाळ), संदिप सोनार(लोकमत),सागर झगडे ( संपादक, पुुणेटुडे9न्युुज), संगिता पाचंगे(प्रभात), विजय गायकवाड(लोकमत) संदिप महामुनी(लोकमत) संजय मराठे(इंडिया २४ न्युज), रमाकांत आरेकर(संपादक, क्रांती समाचार), महादेव मासाळ(लोकमत ) यांचा गुलाबपुष्प, पुस्तक व लेखणी देवून सत्कार फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने करण्यात आला.
मराठी पत्रकारितेचे आद्य संस्थापक बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेची मुहुर्तमेढ रोवली. स्वातंत्र्य चळवळ, समाज सुधारणा व आता बदलते अर्थकारण या क्षेत्रांत मराठी पत्रकार व पत्रकारिता यांनी मोलाची व भरीव कामगिरी बजावली. आज पत्रकारिता ही बिकट परिस्थितीतून जात आहे. कोरोना काळात जीवाची बाजी लावत बातमीसाठी अहोरात्र झगडणाऱ्या पत्रकाराला स्वतःच्या पोटासाठी व घरासाठी संंघर्ष करावा लागत आहे.
यावेळी फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष व नगरसेवक संतोष कांबळे म्हणाले कि, महात्मा जोतिबा फुले, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, न. चिं केळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, आचार्य अत्रे, ना. भि. परुळेकर, गोविंद तळवलकर या आणि अशा अनेक प्रथितयश पत्रकारांनी आपले विचार वृत्तपत्रांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवले. तसेच समाजाला योग्य दिशा दिली आहे.
Comments are closed