सांगवी,दि.६( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी येथे  सांगवी परिसर महेश मंडळ (महिला समिती,), पुणे द्वारा महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी संक्रांती निमित्त उत्पादन प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते . प्रदर्शनाचे उद्घाटन शहराच्या महापौर माई ढोरे यांच्या हस्ते श्री महादेवाच्या मूर्तीस हार घालून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

 

 

यात २५ हुन अधिक स्टॉल्स वर महिला उद्योजकांकडून सैंधव मीठ, लोणचे, खारे पदार्थ , बेकरी पदार्थ, देवाची अलंकारिक वस्त्रे, साड्या, ड्रेस, मेणबत्त्या, इतर कपडे आणि अनेक घरगुती वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते.




महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी स्थानिक नगरसेविका शारदा सोनावणे, इतर मान्यवर नागरिकांसह ५०० हुन अधिक लोकांनी हजेरी लावली. कोविड १९ च्या संदर्भांतील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला .




या प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाची व्यवस्था पद्मा लोहिया, नम्रता नावंदर , गौरी नावंदर , श्रुती मंत्री, जमना राठी, कविता लढ्ढा इत्यादी महिलानी समिती तर्फे उचलली.
या प्रदर्शनात महिलांचा उत्साह पाहून माननीय महापौरांनी महिलांंचे कौतुक केले तसेच महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा आयोजनाची गरज असल्याचे मत व्यक्त केले .

Comments are closed

error: Content is protected !!