दिल्ली,दि.६ (punetoday9news):- उपसंचालक दयानंद कांबळे यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे , उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी बोलताना कांबळे यांनी मराठी पत्रकारितेच्या आरंभापासून ते आतापर्यंतच्या विविध स्थित्यंतराबाबत प्रकाश टाकला.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र काढून मराठी वृत्तपत्रांचा पाया रचला. पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करून ‘दर्पण’च्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकरांनी समाजात नवी जीवनमूल्ये रूजविण्यात मोलाचे योगदान दिले. बाळशास्त्री जांभेकरांच्या या योगदानासाठी त्यांचा जन्मदिन ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
Comments are closed