पिंपरी,दि.६ (punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली येथील सायकलस्वार पर्यावरणप्रेमी केशव अरगडे यांच्या सायकलवारी गडकोटांवर ने दि. २४ डिसेंबर ते ०३ जानेवारी २०२१ दरम्यान पश्चिम महाराष्ट्र गडकोट मोहीम पार केली. केशव अरगडे हे क्रीडा शिक्षक असून गेली २२ वर्षे कराटे व बुद्धिबळ प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत तसेच मागील २२ वर्षांपासून राजगडावर वसुबारस साजरी करत आहेत . २०१८मध्ये दिवाळीत १००० मातीचे दिवे पद्मावती मंदिरात लावून दीपोत्सव साजरा केला आहे व २०१९ पासून आजपर्यंत २३ गडकोटांवर सायकलवारी सोबत सामाजिक संदेश दिला आहे.
२४ डिसेंबर ते ०३ जानेवारी २०२१ दरम्यान सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण ८ गडकोट सर करत जवळपास ७५० कि. मी. अंतर पार केले. यामध्ये वंदनगड , चंदनगड, कल्याणगड , वर्धनगड , अजिंक्यतारा , सज्जनगड , पन्हाळा , वसंतगड पायथ्यापर्यंत सायकल ने तर गडकोट पायी पाऊलवाटेने पार केले. या सायकलवारी सोबत छत्रपती शिवाजी महाराज यांचे संदेश त्यांनी केलेले पाण्याचे नियोजन, तसेच ‘सायकल चालवा निरोगी रहा’ चा संदेश, ‘रहदारीचे नियम पाळा’ असे संदेश फलक लावून ही सायकलवारी गडकोटांवर गेली होती.
सातारा जिल्ह्यातील गडकोट पायथ्याशी सायकलवारी चे स्वागत करण्यात आले तसेच सातारा शहरातील सायकल मित्रांनी जोरदार स्वागत केले. तसेच कोल्हापूर येथे पन्हाळा येथील नायब निवासी तहसीलदार विनय कौलवकर यांनी सायकलवारी गडकोटांवरी चे कौतुक केले आणि १५ मिनिटे सायकलवारी बद्दल माहिती जाणून घेतली.
Comments are closed