पुणे, दि. 8 (punetoday9news):- लोककला व पथनाट्य सादर करणाऱ्या संस्थांची निवड सूची 20 डिसेंबर रोजी संपुष्टात आली आहे. याबाबत नवीन निवड सूची तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील लोककला व पथनाट्य सादर करणाऱ्या संस्थांनी निवड सूचीसाठी जिल्हा माहिती कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, ससून रुग्णालय समोर, पुणे 411001 येथे 21 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
निवडसूचीसाठी विहित नमुन्यातील अर्ज dgipr.maharashtra.gov.in व www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इच्छुक संस्थांनी निवड सूचीसाठीचे अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
Comments are closed