पिंपरी,दि.८(punetoday9news):-  शालेय पोषण आहार 2018-19 व 2019-20 ची थकित काही देयके व देयकातील फराकेचे रक्कम लवकरात लवकर देण्यात यावी यासाठी मंदा फड, महिला विभाग संघटिका, शिवसेना-पिंपरी चिंचवड यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आले.




तसेच पुढील  7 दिवसात यावर कार्यवाही न झाल्यास शिवसेना महिला आघाडी च्या वतीने तीव्र आंदोलन व निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शालेय पोषण आहार 2018-19 व 2019-20 ची काही देय व देयकातील फराकाची रक्कम  महानगरपालिके कडे थकीत आहे. शालेय पोषण आहाराचे काम हे महिला संस्था व बचतगटांना दिलेले असते व त्यावर अनेक महिलांचा व त्यांच्या कुटूंबाचा उदर्निवाह चालतो.




महानगरपालिकेने शिक्षण संचालक पुणे यांना 16 डिसेंबर 2020 रोजी शालेय पोषण आहाराचे राज्य व केंद्र सरकारचे अनुदान अंदाजे 76 लाख रुपये व त्यावरील व्याज बँक खात्यात जमा असल्याचे कळवले आहे. मात्र अद्याप मागील 2 वर्षा पासून शालेय पोषण आहाराचे पैसे महिला बचत गट व संस्थाना अदा झालेले नाहीत. सदर योजना ही महिला संस्था व बचतगटांना उभारी देण्यासाठी आहे. मात्र याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचा खुलासा तत्कालीन अधिकारी यांच्या कडून मागवून संबंधित अधिकारी व पालिका कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.

शालेय पोषण आहाराचे कक्ष व कार्यालय स्वतंत्र दिलेले असताना सुद्धा एवढी दिरंगाई होणे ही एक गंभीर बाब असून कोणाच्या कृपाशीर्वादाने किंवा कोणाच्या सांगण्यावरून दिरंगाई होत आहे का ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

कामात दिरंगाई केलेल्या कामचुकार व निष्क्रिय अधिकारी व पालिका कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!