भंडारा,दि.९( punetoday9news):-  भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.




मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचे सांगितले जात आहे . धुरामुळे गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे . या युनिटमध्ये एकूण सतरा बालके होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आले आहे.




जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊटबॉर्न युनिटमधून रात्री दोनच्या दरम्यान अचानक धूर निघत असल्याचे समोर आल्यावर  ड्युटीवर असलेल्या परिचारिकेने त्वरित रुग्णालयातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आले. मात्र अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच याचा शोध घेवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Comments are closed

error: Content is protected !!