• भाजपा पाठोपाठ राष्ट्रवादीकडूनही आठवडे बाजार सुरु केल्याने सांगवीत दोन ठिकाणी आठवडे बाजार सुरू.

• दुसरीकडे बंद असलेली भाजी मंडई व रस्त्यावरील भाजी विक्री व विक्रेत्यांचे प्रश्न,  रस्त्यांवरील विक्रेत्यांकडून अजुनही सुरू असलेली भाजी विक्री, रस्त्यावरील वाहतूक कोंडी असे प्रश्न अनुत्तरीत. 

जुनी सांगवी,ता.९ (punetoday9news):-

पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवी येथे महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ संत शिरोमणी सावता माळी अभियान शेतकरी ते थेट ग्राहक विक्री या योजनेअंतर्गत येथील शितोळेनगर येथे गुरुवार ता.७ आठवडे बाजारात सुरुवात करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते या आठवडे बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. दर गुरुवारी पश्चिम भागात शितोळे नगर तर पूर्व भागात प्रियदर्शनी नगर एसटी कॉलनी कॉर्नर वसंतदादा पुतळा चौकात दर रविवारी हा आठवडे बाजार असणार असल्याचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी सांगितले.




थेट शेतकरी ते ग्राहक भाजीपाला, कडधान्य,फळे, स्वयंपाक घरात लागणा-या इतर खाद्यपदार्थ हे एकाच ठिकाणी ताजे , दर्जेदार व माफक मिळत असल्याने सांगवीकरांचा आठवडे बाजाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या आठवडे बाजाराबाबत रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांनी मात्र दुर्लक्ष करत चुप्पी साधली आहे. गेली दीड महिन्यापूर्वी येथील ७७ गाळे असलेली भाजी मंडई पंधरा वर्षानंतर सुरू करण्यात आली होती. मात्र अनेक कारणांमुळे ही भाजी मंडई पुन्हा बंद पडली व पुन्हा भाजीविक्रेते रस्त्यावर आले. यातच भाजपा व राष्ट्रवादीकडून दोन ठिकाणी गुरुवार व रविवार आठवडे बाजार सुरू केल्याने याचा परिणाम नक्कीच भाजीविक्रेत्यावर होणार असल्याचे नागरिकांमधून बोलले जाते. मात्र आठवडे बाजारातील थेट शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेत माफक दरात व ताजी भाजी,फळे मिळत असल्याने नागरिकांमधून या आठवडे बाजारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.




यावेळी कुमार ढोरे, आबासाहेब ढमाले, शिवाजी पाडुळे, पंकज कांबळे, सुनिल ढोरे, उज्वला ढोरे, पंकज कांबळे, प्रकाश ढोरे, रुपेश पुजारी, राधिका घोडके, शेखर शितोळे, गणेश शितोळे, धनंजय शितोळे आदी उपस्थित होते.

Comments are closed

error: Content is protected !!