• मागील काही दिवसात परिसरात पिस्तुल बाळगणाऱ्या आरोपींना अटक ; मात्र पिस्तूल पुरवठा करणारे मोठे मासे अजुनही पडद्याआडच.
सांगवी,दि.१० ( punetoday9news):- पिंपरी-चिंचवडमधील जुनी सांगवी मध्ये पत्नी व लहान मुलीसोबत बाहेर फिरण्यासाठी आलेल्या एका ३० वर्षीय तरुणावर अज्ञात व्यक्तीने पिस्तूलातून गोळीबार केला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आनंद ललीतकुमार सोलंकी वय- 30 रा. जुनी सांगवी, असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असुन गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अकराच्या सुमारास जुनी सांगवी येथील शितोळे पेट्रोल पंपाच्या परिसरात जखमी तरुण आनंद, पत्नी आणि शेजाऱ्याची लहान ३ वर्षीय मुलगी असे तिघे जण बाहेर फिरण्यासाठी आले होते. पायी चालत जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात व्यक्तीने जवळून पिस्तूलातून आनंद च्या दिशेने गोळी झाडली यात आनंद च्या मानेला गोळी लागली असून गंभीर दुखापत झाली आहे. अद्याप, गोळीबार करण्याचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकलेले नाही. अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments are closed