पुणे, दि. 10 (punetoday9news):- रक्तदान करणे हे एक मोठे काम असून यामुळे एखादया दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. रक्तदान करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज केले. पुण्यातील कोंढवा येथे महा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीराचे उद्घाटन सत्तार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार चेतन तुपे,माजी आमदार महादेव बाबर, कारी मोहम्मद इदरीस,माजी स्थायी समिती सदस्य रसिद शेख, अलाहद इब्राहिम भाई, उस्मान तांबोळी, नदीम मुजावर, नगरसेवक गफूर पठाण, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, कोरोनाच्या महामारीमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा आल्याने मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केलेले असून रक्तदान करणे हे एक मोठे काम आहे. सर्वांनी रक्तदान केले पाहिजे.
Comments are closed