• 8 फेब्रुवारी 2021 पासून, व्हॉट्सॲप आपली प्रायव्हसी पॉलिसी बदलणार.

• व्हाट्सॲप  वापरकर्ते सिग्नल, टेलिग्राम कडे वळण्याची शक्यता. 

पुणे, दि. ११( punetoday9news):- लोकप्रिय मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप आणि फेसबुकविरोधात जगभरात संताप वाढत आहे. याचे कारण म्हणजे व्हॉट्सॲप आणि फेसबुकने आपली प्रायव्हसी पॉलिसी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या पॉलिसीमुळे युझर्सची वैयक्तिक माहिती लीक होण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गचे टेंशन वाढवण्याचे काम केले आहे.  मस्क यांनी लोकांना मेसेजिंग ॲप ‘सिग्नल’ (Signal) वापरण्याचे ट्विटर द्वारे आवाहन केले आहे.




काही वापरकर्त्यांनी व्हॉट्सॲपच्या या पॉलिसीवर प्रश्न उपस्थित केले आहे आणि युजर्सना सिग्नल तसेच टेलिग्राम यांसारख्या ॲपकडे वळण्याचे आवाहन केले आहे. मस्क यांची साथ मिळाल्याने ‘सिग्नल’ची लोकप्रियता झपाट्याने वाढू लागली  आहे.




असे आहे सिग्नल ॲप:-
फेसबुकनला विकल्यानंतर व्हॉट्सॲपचे सह-संस्थापक ब्रायन अ‍ॅक्टनने सिग्नल फाऊंडेशनची स्थापना केली होती. फेसबुक मेसेंजर प्रमाणेच हे इन्स्टंट मेसेजिंग ॲप देखील जगातील सर्वात सुरक्षित मानले जाते. सिग्नल एक प्रसिद्ध प्रायव्हसी-फोकस्ड मेसेजिंग ॲप आहे, ज्याचा वापर जगभरातील सिक्युरिटी एक्स्पर्ट्स, प्रायव्हसी रिसर्च, अकॅडमिक्स आणि पत्रकार करतात.

Comments are closed

error: Content is protected !!