पुणे दि.११( punetoday9news): – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे विभागातंर्गत शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व्यायामशाळा विकास अनुदान योजना राबविण्यात येत असून त्याची अनुदान मर्यादा कमाल 7.00 लाख इतकी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी पत्रकान्वये दिली आहे.





जिल्हा नियोजन समिती, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय या कार्यान्वयीन यंत्रणेद्वारे उपरोक्त शासन निर्णयांच्या अधीन राहून, व्यायामशाळा विकास अनुदान योजनेतंर्गत जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, शासकीय विभाग, आदिवासी व समाजकल्याण विभागातंर्गत शासकीय आश्रमशाळा व स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका यांना खुली व्यायामशाळा साहित्य व व्यायामशाळा साहित्य खरेदीसाठी ७ लाख इतके कमाल अनुदान प्रदान करण्यात येते.




अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत ज्या गावांत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीमध्ये व्यायामशाळा उपलब्ध असेल तेथे व्यायामसाहित्य उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच दलित वस्ती किंवा वस्तीच्या नजीकच्या परिसरात सुयोग्य मोकळी जागा उपलब्ध असेल तर खुले व्यायामशाळा साहित्य उपलब्ध करुन देण्यात येईल.
स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका व पात्र विभागांनी सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे द्वारा विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, मोझे हायस्कूल समोर येरवडा पुणे येथे उपलब्ध विहित नमुन्यातील अर्जासह प्रस्ताव दि. २० जानेवारी २०२१ पर्यंत सादर करावेत किंवा अर्ज वा अधिक माहितीसाठी www.dsopune.com या वेबसाईटला भेट द्यावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी केले आहे.

Comments are closed

error: Content is protected !!