दापोडी,दि.१२(punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी येथील गणेश नगर व पुणे मुंबई हायवेला जोडणारा भाई कोतवाल उड्डाणपुलावरील वळण असलेल्या रस्त्यांवरील डांबर निघुण गेल्यामुळे रस्ता धोकादायक बनून अपघात होत आहेत.
उड्डाण पुलावरील वळणावर निर्माण झालेल्या खड्यांमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते तर दुचाकीस्वार पडून छोटेमोठे अपघात होत आहेत. त्या रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण पालिकेने करावे या संदर्भात मनसेच्या वतीने ‘ह’ प्रभाग येथे सहाय्यक आयुक्तांना निवेदन देवून त्वरित रस्त्याचे काम करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी मनसे उप विभाग अध्यक्ष अलेक्स मोझेस, दिलीप ठोंबरे, सागर भोकरे, भिम मुळे, प्रशांत सांगळे, सतीश मात्मार्थी, पंकज ओव्हाळ उपस्थित होते.
Comments are closed