पिंपळे गुरव, दि.२( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव भागात वेश्या व्यवसाय करणाऱ्या 16 विदेशी तरुणींना सामाजिक सुरक्षा पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. 
सांगवी परिसरातही काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे नायजेरियन तरूणींकडून गैरप्रकार चालू असल्याची माहिती व तक्रार नागरिकांनी दिली होती.  तर दुसरीकडे पिंपळे सौदागर येथेही मसाज पार्लरमध्ये जाऊन पोलिसांनी कारवाई केली होती व आता पुन्हा पिंपळे गुरव सारख्या भागात वेश्या व्यवसाय चालत असल्याच्या माहितीने परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.
या प्रकारात चार महिला या इतर तरुणींना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करत असल्याचे समोर आले आहे. या सर्व तरुणी नायजेरियन असून काही तरुणींकडे पासपोर्ट नसल्याचेही समोर येत आहे.
घटनेचा अधिक तपास सांगवी आणि सामाजिक सुरक्षा पथक करत आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी दिली आहे. ही कारवाई सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सांगवी पोलीस ठाण्याचे पोलिस यांनी केली आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!