चऱ्होली,दि.५(punetoday9news) :- विदर्भ माळी समाज उत्कर्ष संघ भोसरी , पिंपरी चिंचवड पुणे यांच्यावतीने रविवार दि. ७ फेब्रुवारी २०२१ रोजी कै . अंकुशराव लांडगे नाट्यगृह पुणे , नाशिक रोड भोसरी येथे कौटुंबिक व युवक – युवती परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .
पुणे परिसरातील व नोंदणीकृत युवक – युवतींनी उपस्थित राहण्याचे आवाहन मेळावा प्रसिध्दी प्रमुख पराग येनकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणाऱ्या युवक युवती परिचय संमेलनात राज्यभरातून माळी समाजबांधव उपस्थित राहणार आहे. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्यावर मी सावित्री बोलतेय हा एकपात्री प्रयोग काव्या मोहन राऊत ही बालकलाकार सादर करणार आहे.
प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न होणार असून मेळावा आयोजन कार्यकारीणी गजानन चोपडे ( अध्यक्ष मेळावा २०२१ ) , कार्याध्यक्ष योगेश गाडगे, अध्यक्ष श्रीकृष्ण वावगे, उपाध्यक्ष निलीमा उमाळे, शरद अत्तरकार, सचिव गजानन निमकर्डे, आशिष उमरकर, कोषाध्यक्ष दामोदर गाडगे, संजय सुगदेवराव बगाडे, कार्याध्यक्ष श्रीकृष्ण अत्तरकार, प्रदिप तायडे, माजी मेळावा अध्यक्ष सुखदेवराव वानखडे कार्यरत आहेत.
Comments are closed