पिंपरी,दि.५( punetoday9news):- पेरणे फाटा ता.हवेली येथील जयस्तंभ इंचार्जे से.नि. कॅप्टन बाळासाहेब आनंदराव जमादार(माळवदकर) व समस्त जमादार (माळवदकर) परिवार यांच्या वतीने तीर्थक्षेत्र, धर्मपीठ, श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे पूजन नुकतेच पार पडले.
१९७ वर्षांपासून ऐतिहासिक वारसा असणारे माळवदकर (जमादार) या कुटुंबाकडून पेरणे फाटा येथील जयस्तंभाची पिढ्यान पिढ्या संरक्षणाची जबाबदारी ब्रिटिश काळापासून करण्यात येत आहे.माळवदकर कुटुंबाला जमादार हा हुद्दा देऊन १८२४ मध्ये जयस्तंभ इंचार्जे म्हणून नेमण्यात आले आहे.वढू बुद्रुक येथे धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावर दैनंदिन नित्य पूजा करण्यात येते या पूजेची सुरुवात १ फेब्रुवारीपासून वर्षभराचे नियोजन असते. असे जमादार कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आले .
या वेळी समाधी परिसर स्वच्छ करण्यात आला, समाधीवर हार, पुष्प लावून प्रार्थना, शंभू घोषणा करण्यात आली. याप्रसंगी इतिहास संशोधक रोहन माळवदकर जमादार, ज्योती माळवदकर जमादार व समस्त माळवदकर जमादार परिवार, दादासाहेब भोंडवे, संदीप शिवले व ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments are closed