सजग नागरिक :-
चिंचवड,दि.५ (punetoday9news) :- चिंचवड गावात मोरया गोसावी मंदिर शेजारी जिजामाता उद्यान मध्ये रोज सकाळी शेकडो नागरिक मॉर्निंग वॉक साठी येतात पण शेजारी पवना नदी मध्ये खूप जलपर्णी व मोठे मोठे गवत उगवले आहे . त्यामुळे पूर्वीची नदीची स्वच्छ प्रतिमा झाकोळली गेली आहे . तसेच जलपर्णी मुळे डासांचा उपद्रवही वाढला आहे . गवत वाढण्यापूर्वी पवना नदीच्या कडेला थांबून नागरिक मासे बघायचे मात्र आता तेथे मोठे गवत वाढल्याने पूर्वीचे नदीचे त्या भागातील सौदर्य झाकले गेले आहे . प्रशासनाने त्वरित दखल घेऊन नदीपात्रातील गवत काढून स्वच्छता करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
प्रतिसाद:- बसवराज मगी, चिंचवड.
Comments are closed