पुणे, दि.५ (punetoday9news) :- मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यंतर्गत जप्त केलेल्या 120 वाहनांचा जाहीर लिलाव प्रादेशिक परिवहन कार्यालय, संगमब्रीज, पुणे येथे ई-लिलाव पध्दतीने 16 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता ठेवण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी परिपत्रकान्वये दिली आहे.
ही वाहने संगमब्रीज जवळील प्रादेशिक परिवहन कार्यालय व वाघोली येथील वाघेश्वर पार्किंग येथील आवारात पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. यामध्ये टुरिस्ट टॅक्सी, ट्रक व बस या वाहनांचा समावेश असून ‘जशी आहेत तशी’ या तत्वावर जाहीर लिलावाद्वारे विकली जाणार आहेत. लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहील, याची वाहन मालकांनी नोंद घ्यावी असे सांगण्यात आले आहे .
लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी तसेच ई-लिलावाच्या अटी व नियम 9 फेब्रुवारी 2021 पासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सूचना फलकांवर तसेच www.eauction.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ई-लिलावात सहभागी होण्यासाठी दिनांक 9 फेब्रवारी 2021 ते 11 फेब्रुवारी 2021 सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत www.eauction.gov.in या संकेतस्थळावर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुपये 25 हजार रक्कमेचा R.T.O. PUNE या नावाने अनामत धनाकर्षसह नाव नोंदणी करुन प्रत्यक्ष येऊन पूर्तता करावी. जीएसटी धारकांनाच ई-लिलावात सहभागी होता येईल. सविस्तर माहितीसाठी संबंधित व्यक्तींनी कार्यालयाशी संपर्क करावा.
कोणतेही कारण न देता जाहीर लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकुब ठेवण्याचे अधिकार प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कर वसुली अधिकारी यांनी स्वत:कडे राखून ठेवले आहे. प्रथम 16 फेब्रुवारी रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि द्वित्तीय 26 फेब्रुवारी रोजी वाघेश्वर पार्किग येथे ई-लिलाव आयोजित करण्यात आल्याचेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
Comments are closed