पुणे,दि.७( punetoday9news):- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, पौड रोड, पुणे उन्नत भारत अभियान कै. बाबुरावजी घोलप स्मृती सप्ताह अंतर्गत फॅमिली प्लांनिंग असोसियशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने महिलांसाठी आरोग्य जनजागृती शिबिराचे आयोजन मु.पो.होतले ता. मुळशी येथे करण्यात आले होते.


या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळकृष्ण झावरे,माजी सरपंच स्वाती कुंडलिक दुर्गे, डॉ. सपना राणे, डॉ. नीता कांबळे, प्रा. तानाजी जाधव द फॅमिली असोसियशन ऑफ इंडिया चे श्री. नितीन दळवी, डॉ.अर्चना ससाणे, डॉ.पौर्णिमा साळुंखे उपस्थित होते.
या जनजागृती शिबिराचा उद्देश स्त्रियांच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर काही नेमके बदल होत असतात याबाबत ग्रामीण भागात जागरूकतेची उणीव असल्याने अशा महिला आपसूकच भोंदूबाबा, हकिमांच्या जाळय़ात फसतात. शिवाय तिथे उपचारही मीळणेही दुर्लभ. यामुळेच अशा महिलांना उपचार मिळेपर्यंत त्यांचा आजार खूप वाढलेला असतो. यातील महत्त्वाचे कारण म्हणजे अर्थात त्या त्या आजाराबाबतची माहिती नसणे. यामध्ये कर्करोग,प्रजनन आरोग्य,प्रसूतीदरम्यानचे आरोग्य, आजार,हिंसाचार,मानसिक स्वास्थ्य, पौगंडावस्थेतल्या समस्या,वार्धक्य इत्यादी विषयावर डॉक्टरांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळकृष्ण झावरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले “कुटुंबाची काळजी घेणारी महिला कायम आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. ती जागरूक व्हावी आणि समाजातही तिच्या आरोग्याबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी, हे गरजेचे आहे. आहार, चांगल्या सवयी आणि वैद्यकीय सल्ला या त्रिसूत्रीवर महिलांचे आरोग्य टिकणे आवश्यक आहे. आज महिला घराबाहेर पडून स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या धकाधकीच्या जीवनात महिलांनी कामासोबत आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे झाले आहे हा उद्देश या जनजागृती शिबीर आयोजनामध्ये आहे”
जनजागृती शिबिराचे आयोजन प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.अशोक शेळके यांनी केले.

Comments are closed

error: Content is protected !!