निफाड,दि.७( punetoday9news):- नाशिक जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक निफाडच्या विश्राम गृहावर संपन्न झाली.
तुळजापूरच्या कार्यकारिणीत ठरल्या प्रमाणे सदस्य नोंदणी मोहिमेची रणनीती ठरवण्यात आली. तसेच 26 फेब्रुवारीला राजू शेट्टी यांच्या नाशिक जिल्हा दौऱ्याचीही तयारीचा आढावा घेण्यात आला .
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, जिल्हाध्यक्ष साहेबराव मोरे, पक्ष जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, पक्ष जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ, विभागीय सचिव निवृत्ती गारे पाटील, तालुका अध्यक्ष भाऊसाहेब तास्कर , संजय जाधव, सचिन कड, राम राजोळे, शशांक शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Comments are closed