• सौदार्हपूर्ण क्रिकेट सामन्याने पत्रकार, नगरसेवक व पोलिस संघांनी केले अनोखे खेळ प्रदर्शन. 

सांगवी,दि. ७ ( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी येथे पीडब्ल्यूडी मैदानावर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आमदार चषक’ क्रिकेट सामन्यांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. 

 

याठिकाणी आयोजकांनी पत्रकार, पोलिस व नगरसेवक यांच्यात मैत्रीपूर्ण सामना आयोजित करून मागील आठ- नऊ महिन्याच्या धावपळीनंतर क्रिकेट खेळातून थोडा आराम व उत्साह देण्याचा प्रयत्न केला.

पहिला सामना पत्रकार विरूद्ध पोलिस असा खेळवण्यात आला यावेळी नियमित खेळाचा सराव असणाऱ्या पोलिस खेळाडूंनी चमकदार खेळी करत सामना जिंकला तर  नगरसेवक विरूद्ध पोलिस सामन्यात नगरसेवक संघाकडून शंकरशेठ जगताप यांनी चमकदार खेळी करत उत्तुंग अशा चौकार, षटकारांची आतिशबाजी केली.  मात्र उत्कृष्ट अशा खेळीनंतरही नगरसेवक संघाचा विजय पोलिस संघाने खेचून नेला.

मात्र सामना गमावूनही उत्कृष्ट खेळीने शंकरशेठ जगताप यांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. समालोचकाच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, “क्रिकेट सोबतच टेनिस, बॅडमिंटन, व्हाॅलिबाॅल अशा खेळ प्रकारांची आवड आहे. तसेच सचिन तेंडुलकर, कपिल देव हे त्यांच्यासाठी आदर्श खेळाडू आहेत.”

यावेळी पत्रकार संघामध्ये संजय मराठे, सागर झगडे, संदीप सोनार, रमेश मोरे,संतोष महामुनी, विजय गायकवाड, रमाकांत आरेकर, महादेव मासाळ, बलभीम भोसले, प्रकाश जमाले, सुनील बेनके यांनी सहभाग नोंदवला.

स्नेहपूर्ण अशा सामन्यांचे आयोजन केल्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने आयोजकांचे आभार मानण्यात आले.

 

Comments are closed

error: Content is protected !!