मुंबई,दि.८( punetoday9news):- दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनबाबत सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटची आता चौकशी होणार आहे. केंद्र सरकारच्या दबावाखाली सेलिब्रिटींनी ट्वीट केले का? याची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
काँग्रेस नेत्यांच्या तक्रारीनंतर गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्याचे गुप्तहेर विभाग याची चौकशी करणार आहे. पॉप गायिका रिहानासह इतरांना उत्तर देताना अनेक सेलिब्रिटींनी विरुद्ध ट्वीट केले होते.
यामध्ये सुनील शेट्टीने मुंबई भाजप नेते हितेश जैन यांना टॅग केले होते. तर अक्षय कुमार आणि सायना नेहवाल ह्यांच्या ट्वीटमधील शब्द आणि शब्द समान होता. यावरून हे सेलिब्रिटी भाजप सरकारच्या दबावात येऊन ट्वीट करत आहेत का? असा सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला होता.
सचिन तेंडुलकरने ट्वीटमध्ये म्हटले होते की, “भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही.” बाह्य शक्ती प्रेक्षक असू शकतात. मात्र, ते सहभागी असू शकत नाही. भारतीयांना भारत माहित आहे आणि ते भारतासाठी निर्णय घेऊ शकतात. आपण एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया.
यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सचिनच्या घराबाहेर आंदोलन करत तु आमच्या शेतकरी मायबापासाठी कधी ट्विट करणार असा सवाल उपस्थित केला आहे.
Comments are closed