पुणे, दि. ९( punetoday9news):- पुणे जिल्ह्यातील एकूण 746 ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्या सभेमध्ये सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार 9 आणि 10 फेब्रुवारीला सरपंच आणि उपसरपंदाची निवड होणार आहे.
मात्र, खेड तालुक्यातील भोसे, बारामती तालुक्यातील निंबुत आणि शिरुर तालुक्यातील शिक्रापूर या ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली.
बारामती, शिरूर आणि खेड तालुक्यात 9 आणि 10 फेब्रुवारीला सरपंच आणि उपसरपंदाची निवड न करता ही निवड प्रक्रिया 16 फेब्रुवारी 2021 पर्यंत स्थगित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत .
मात्र हे भाग वगळता इतर 9 तालुक्यांमधील ग्रामपंचायतींमधील सरपंच-उपसरपंचपदाची निवड 9 आणि 10 फेब्रुवारीला करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या 9 तालुक्यांमध्ये हवेली, मुळशी, भोर, वेल्हा, इंदापूर, दौड, जुन्नर, आंबेगाव आणि पुरंदर यांचा समावेश आहे.
Comments are closed