भोसरी,दि.९(punetoday9news):- विदर्भ माळी समाज उत्कर्ष संघ आयोजित माळी समाज वधू-वर परिचय मेळावा भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी राज्यभरातून युवक युवती परिचय संमेलनात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव कार्याचे प्रमुख दिपक सदाफळे तर प्रमुख उपस्थिती माजी महापौर राहुल जाधव, अपर्णा डोके, पिंपरी चिंचवड ओबीसी परिषद अध्यक्ष आनंदराव कुदळे, माळी समाज उत्कर्ष संघ अध्यक्ष श्रीकृष्ण वावगे, प्रभाकर सातव, प्रभुदास सपकाळ, अनिल कातळे, जेष्ठ माजी नगरसेवक वसंत लोंढे, नगरसेवक विकास डोळस, नगरसेविका हिराबाई घुले, आश्विनी जाधव, चेतन घुले, संतोष जाधव, धनंजय आल्हाट, सुगदेव उमरकर, शंकरराव क्षीरसागर, देविदास रहाटे, विनायक काळपांडे परशुराम आल्हाट, कुलदीप परांडे, ज्ञानेश आल्हाट, निलिमा उमाळे, महादेव खिरडकर, बळीराम वानखडे, रूपाली आल्हाट, सुखदेव वानखडे, मेळावा अध्यक्ष गजानन चोपडे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात महात्मा फुले व क्रांतीज्योती साविञीमाई फुले यांच्या प्रतिमेला प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या हस्ते दिप पुजनाने झाली. तसेच माळी समाजाच्या वधू-वर परिचय संमेलनाच्या रेशीमगाठी स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यावेळी सहा वर्षाच्या नवोदित बालकलाकार काव्या मोहन राऊत हिने मी सावित्री बोलतेय या एकपात्री नाट्याने उपस्थितांची मने जिंकून कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले होते.
दुपारच्या सत्रात वधू-वर परिचय संमेलनात राज्यभरातून सहभागी झालेल्या युवक युवतींनी परिचय करून दिला. यावेळी संमेलनाला राज्यभरातून युवक युवतींनी नोंदणी केली होती. संमेलनाचे सुञसंचालन दामोदर गाडगे, प्रास्तविक श्रीकृष्ण अत्तरकार, तर आभार दिनेश धाडसे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरद अत्तरकार, गजानन निमकर्डे, आशिष उमरकर, प्रदिप तायडे, पराग येनकर, सुरेश जुमडे, अरुण वानखडे, अरुण गिऱ्हे, संजय बगाडे, उमेश तायडे, राजेंद्र रोटे, गजानन सातव , रवींद्र घाटे, प्रकाश कवर, अंजली भोपळे, सुनिल इंगळे, गजानन रहाटे, अभिजित वैराळे,तुषार उमाळे, गणेश तायडे, गोपाल वावगे, संजय बावस्कर, रामकृष्ण बोंबटकार यांनी परिश्रम घेतले.
Comments are closed