पुणे, दि. 9( punetoday9news):- लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून फेरफार अदालती मंडळ स्तरावर दर महिन्याच्या दुस-या बुधवारी घेऊन जनतेच्या प्रलंबित साध्या,वारस,तक्रारी नोंदी निर्गत करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.

फेब्रुवारी महिन्यातील फेरफार अदालत उद्या दिनांक 10 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित करण्यात आली असल्याचे कुळकायदा शाखेचे तहसिलदार निलप्रसाद चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

जिल्हा प्रशासनाने जानेवारी महिन्यात झालेल्या अदालतीमध्ये 4 हजार 243 नोंदी निर्गत केल्या आहेत. जिल्हयात सध्या 26 हजार 770 नोंदी प्रलंबित असून त्यापैकी 17 हजार 936 नोंदी नोटीस काढणे व बजावण्यावर प्रलंबित आहेत. 9 हजार 619 नोंदी प्रमाणीकरणासाठी उपलब्ध असून यापैकी जास्तीत जास्त नोंदी निर्गत करण्याच्यादृष्टीने फेरफार अदालतीमध्ये प्रयत्न केले जाणार आहेत.

फेरफार अदालतीसाठी संबंधित महसूल मंडलातील तलाठी व मंडळ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच उपविभागीय अधिकारी, तहसिलदार काही फेरफार अदालतीला उपस्थित राहणार आहेत. फेरफार अदालतीसाठी संबंधित व्यक्तींनी संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित राहून मंडळ अधिकारी यांना आवश्यक ते कागदपत्र सादर करुन आपल्या नोंदी निर्गत कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

Comments are closed

error: Content is protected !!