• ठाकरे सरकार विरूध्द राज्यपाल वादाचा अंक विमान प्रशासनापर्यत.
• शीतयुध्दाच्या लढाईत नवीन राजकीय नाट्य.
• शपथविधी दरम्यान आमदारांना पुन्हा शपथ घेण्याची घटना.
• कोरोना काळात झालेला पत्रव्यवहार. सरकार वर केलेली टीका.
• मंदिरे उघडवण्यावर झालेली टीका.
• रखडलेल्या विधानपरिषदेच्या १२ नेमणूका.
• शेतकरी आंदोलन राज्यपाल न झालेली भेट.
• ते राज्यपालांना विमान नाकरल्याची घटना.
• आता कोण योग्य आणि कोण अयोग्य यावर सर्वत्र राजकीय चर्चा रंगली आहे.
मुंबई, दि.१२( punetoday9news):- राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.
राजभवनाने राज्यपालांना विमान घेऊन जाण्यास मान्यता देण्याविषयी राज्य शासनास विनंती केली होती. शासकीय विमान घेऊन जाण्यापूर्वी नियमानुसार परवानगी मागितली जाते व मान्यता मिळाल्यानंतरच विमान उपलब्ध केले जाते असा नियम आहे. यानुसार बुधवार, दिनांक 10 फेब्रुवारीस मुख्यमंत्री सचिवालयातून विमान वापराबाबत अद्याप मान्यता दिलेली नसल्याचा निरोप देण्यात आला होता. अशी माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली आहे.
या मुद्द्यावरून सध्या महाविकास आघाडी सरकरा आणि भाजप एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या वादावर भाष्य केले आहे. सरकारी विमान न मिळाल्याने खासगी विमानाने प्रवास केल्याचे सांगत त्यांनी राज्य सरकारला चिमटा काढला आहे.
तर दुसरीकडे विरोधी पक्षातील नेत्यांनी जाणीवपूर्वक विमान नाकारल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे राजकीय शीतयुध्दाचे घमासान तयार झाले असल्याचे राजकीय विश्लेषक बोलत आहेत.
Comments are closed