• ब्लॉसम इंग्लिश मेडियम स्कूल व गुरु नानक हाय स्कूल मध्ये रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम संपन्न .
• प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे विभागाच्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ज्योती कांबळे, सोनल गावीत, रेश्मा शेख, सुप्रिया सरवदे यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन.
नवी सांगवी, दि.१२( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील नवी सांगवी येथील जनता शिक्षण संस्थेच्या ब्लाॅसम इंग्लिश मेडियम स्कूल व गुरुनानक हायस्कूल मध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे (RTO) च्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम राबविण्यात आला.
यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका पलांडे वृषाली व तबस्सुम बादशाह, प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे विभागाच्या ज्योती कांबळे, सोनल गावीत, रेश्मा शेख, सुप्रिया सरवदे व इतर शिक्षक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पोलिस मार्गदर्शकांकडून विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी सायकल चालवताना कोणती काळजी घ्यावी, परवाना प्राप्त वाहनचालकांनी वाहन चालवताना कोणत्या नियमांचे पालन करावे, हेल्मेट चा वापर, सीट बेल्ट चा वापर, दिशादर्शकांची माहिती, रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल, वाहनांचा मर्यादित वेग, वाहनांमधील अंतर, सूचना दर्शक पाट्यांची माहिती सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना दिली.
ही विद्यार्थ्यांना माहिती देताना रंजक गोष्टी बरोबरच दृकश्राव्य माध्यमाचा वापर करत विविध अपघात व सुरक्षा विषयक उपाययोजना सांगणारे ध्वनिफीत( व्हिडिओ) सुद्धा दाखवण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना माहिती दिल्यानंतर ती माहिती विद्यार्थ्यांना समजली किंवा नाही हे तपासत प्रश्नमंजुषा कार्यक्रमही घेण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्नांची उत्तरे देत सक्रिय सहभाग नोंदवला.
वाहतुकी विषयीच्या नियमांची रंजक पद्धतीने माहिती मिळाल्याने विद्यार्थी आनंदी झाले कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयी प्रतिज्ञा देण्यात आली.
मार्गदर्शकांकडून मिळालेल्या पारितोषिकाबद्दल विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी प्रशासनाच्यावतीने आलेल्या मार्गदर्शकांचे आभार मानले.
Comments are closed