पुणे,दि.१३( punetoday9news):- पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणी विरोधकांनी केलेल्या कारवाईच्या मागणीमुळे आणि वाढत्या सोशल मिडियावरील दबावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे.
शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव या प्रकरणात पुढे येत असल्याने, विरोधकांनी शिवसेनेवर चांगलाच दबाव टाकत कारवाईची मागणी केली आहे.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेतली असून, या प्रकरणातील प्रत्येक बाबीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आहे.
विरोधक आणि शिवसेनेचे मंत्री, तसेच अधिकारी महोदय देखील मुख्यमंत्री याबाबत अधिक भाष्य करतील असे सांगत आहेत. तसेच राठोड यांना प्रतिक्रिया देण्याचे टाळण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मिळाली आहे.
मेडिकल रिपोर्ट, याप्रकरणी मिळालेले जवाब, आणि व्हायरल झालेले संभाषण, त्यातील आवाज संजय राठोड यांचा आहे का याबाबतची पडताळणी अशा अनेक गोष्टींचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला असल्याची माहिती आहे. त्यामुळे आज दिवसभरात मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Comments are closed