पुणे दि.13( punetoday9news):- जिल्हाधिकारी कार्यालय आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील एकून 9 कर्मचाऱ्यांना महसूल सहायक संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच वाहन चालक संवर्गातून महसूल सहायक संवर्गात कायम स्वरूपी बदलीने 2 कर्मचार्यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडील दिनांक 2 नोव्हेंबर 2018 च्या शासन निर्णयामुळे महसूल विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र झाल्याने सदर पदोन्नती मागील 4 वर्षापासून रखडल्या होत्या.
अंतर विभाग बदलीने, मयत, राजीनामा दिल्याने रिक्त झालेली पदे पदोन्नतीच्या संवर्गातून अतितात्काळ भरण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे.
Comments are closed