दिल्ली,दि.१५( punetoday9news):-  भारतात आता परदेशातील प्रत्येक गोष्टीला स्वदेशी पर्याय देण्यासाठी स्पर्धा सुरु झाल्याचं दिसतंय. व्हॉट्स ॲपला पर्याय संदेस, ट्विटरला पर्याय कू आले आहेत. आता गुगल मॅपला पर्याय म्हणून स्वदेशी मॅप माय इंडिया ( MapmyIndia) सुरु होत आहे . हा प्रकल्प इस्त्रो आणि मॅप माय इंडियाच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात येणार आहे.

मॅप माय इंडियाने आपल्या सोशल मीडियावरुन तसं जाहीर केलं आहे. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत हा प्रकल्प सुरु करण्यात येत असल्याचे MapmyIndia ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता नेव्हिगेशन किंवा इतर सुविधांसाठी गुगल मॅपवर अवलंबून राहण्याची गरज नाही.

डिपार्टमेन्ट ऑफ स्पेसने MapmyIndia शी भागिदारी केली आहे असं इस्त्रोकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याच्या निर्मितीसाठी NavIC, Bhuvan सारख्या स्वदेशी उपग्रहांची मदत घेण्याचे ठरले आहे. NavIC लाच इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (IRNSS) असंही म्हटले जात आहे . याचा विकासही इस्त्रोने केला आहे. तसेच Bhuvan या जिओ-पोर्टलचाही विकास इस्त्रोने केला आहे.




MapmyIndia मध्ये गुगलमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा मिळणार आहेत. महत्वाचे म्हणजे भारताच्या सीमा दाखवताना गुगल मॅपकडून काहीवेळा जो घोळ होतो तो MapmyIndia मध्ये होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे . कारण यामध्ये सरकारने देशाच्या ज्या सीमा निर्धारित केल्या आहेत त्याच दाखवल्या जाणार आहेत. त्यामुळे भारताच्या अंखडतेचा आदर केला जाणार असल्याचंही MapmyIndia कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!