पुणे,दि.१५( punetoday9news):-  टोल नाक्यावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि महामार्गावर विनाअडथळा वाहतुकीसाठी ‘फास्ट टॅग’ प्रणालीला मुदतवाढ दिली जाणार नाही, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. पण अजुनही कित्येक वाहनचालकांना फास्टॅग म्हणजे नक्की काय हेच माहीत नाही अशी अवस्था आहे. फास्टॅग काय व कसे मिळणार? या विषयीची माहिती जाणून घेवूया.

फास्ट टॅग नसलेल्या वाहनांना आता 15 फेब्रुवारी मध्यरात्रीपासून टोल नाक्यावर दुप्पट टोल भरावा लागेल.

देशातल्या सगळ्या राष्ट्रीय महामार्गांवर भरला जाणारा टोल हा 1 डिसेंबर 2019 नंतर फास्टॅगद्वारे भरण्यात यावा, असे वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले होते . पण आता ही मुदत वाढवून आधी 15 डिसेंबर केली. नंतर पुन्हा फास्ट टॅगला मुदतवाढ देण्यात आली.

हा फास्टॅग एखाद्या स्टिकरसारखा आहे. कारच्या पुढच्या काचेवर हा टॅग लावावा लागेल. या टॅगच्या मार्फत ‘कॅशलेस’ म्हणजे रोख व्यवहार न करता टोल भरण्याकडे लोकांचा कल वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.

फास्टटॅग नक्की काय आहे?
फास्टटॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी – RFID तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करते.

रोख पैशांचे व्यवहार न करता टोल भरण्यासाठी या फास्टॅगचा वापर होईल.

सध्या रोख पैसे देऊन वा कॅशलेस अशा दोन्ही पद्धतींनी टोल भरता येतो.

पण नवीन नियमांनुसार हा फास्टॅग असणाऱ्या गाड्यांना टोल नाक्यावर थांबावे लागणार नाही. या व्यक्तीच्या टोलची रक्कम टॅगशी जोडलेल्या प्री-पेड अकाऊंट वा बँक अकाऊंटमधून कापली जाईल.

टोलनाक्यांवर लोकांची अडचण होऊ नये, म्हणून सरकारने राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांच्या सगळ्या लेन्स या फास्टॅग लेन्स करण्याचे ठरवले आहे . इतर प्रकारांनी टोल भरायचा असेल तर त्यासाठी दोन्ही बाजूची प्रत्येकी एक लेन राखीव ठेवली जाईल. या लेनला ‘हायब्रिड लेन’ असे म्हटले जाईल.

फास्टॅगमुळे होणारा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे यामुळे टोलनाक्यांवरची गर्दी कमी होईल. गाड्या न थांबता टोल नाका पार करतील. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि गाड्या खोळंबून राहिल्याने होणाऱ्या धुराचे प्रमाण कमी झाल्याने प्रदूषणही काहीसे कमी होईल.

याशिवाय सरकारकडे फास्टटॅगमुळे प्रत्येक गाडीचा डिजिटल रेकॉर्ड तयार होईल. म्हणजे गरज भासल्यास एखादी गाडी ट्रॅक करणेही यामुळे सोपे होईल.

शिवाय वाहन चालकांनाही सोबत सुट्टे पैसे वा रोख रक्कम जवळ बाळगावे लागणार नाहीत.

याशिवाय वाहनाने प्रवास करणाऱ्यांना खर्चाचा आढावा घेणे सोपे जाईल. कारण टोल डिजीटल पद्धतीने भरल्याने त्याचा तपशील ‘अकाऊंट स्टेटमेंट’मध्ये मिळेल.

कुठे मिळेल फास्टटॅग?

लोकांना सहजपणे फास्टॅग विकत घेता यावा, यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे.बँका, इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यासारख्या ठिकाणी फास्टॅगच्या विक्रीसाठी 18 नोव्हेंबरपर्यंत 28,500 विक्री केंद्र उभारण्यात आली आहेत.यासोबतच आरटीओ (RTO) कार्यालय, सर्व सेवा केंद्र, वाहतूक केंद्र आणि काही निवडक पेट्रोल पंपांवरही हे फास्टॅग उपलब्ध आहेत.

डिसेंबर पर्यंत लोकांना फास्टॅग मोफत देण्यात यावेत अशा सूचना केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिल्या आहेत. या फास्टॅगसाठीचे 150 रुपये 1 डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरेल.कार, जीप्स आणि व्हॅनसाठीचे फास्टॅग हे ॲमेझॉन, पेटीएम, स्टेट बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, HDFC बँक, IDFC फर्स्ट बँक यांच्या वेबसाईटवरून ऑनलाईनही विकत घेता येतील.
तुमच्या जवळचे फास्टॅग केंद्र शोधण्यासाठी ॲण्ड्रॉईड फोनवर My FASTag App डाऊनलोड करता येईल.

यासाठी ही http://www.fastag.org/apply-online वेबसाईटही तयार करण्यात आली असून इथे जाऊनही तुम्ही फास्टॅग अर्ज करू शकता. या योजनेशी संलग्न असणाऱ्या सगळ्या बँकांची नावेही यात आहेत. इथे तुम्ही फास्टॅग रिचार्जही करू शकता.

अधिक माहिती मिळवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या 1033 या हेल्पलाईनवर फोन करता येईल.
इतर कोणत्याही प्री-पेड कार्डप्रमाणेच हा फास्टॅगही रिचार्ज करता येईल. UPI द्वारे किंवा मग नेटबँकिंग, क्रेडिट वा डेबिट कार्डच्या मदतीने फास्टटॅग रिचार्ज करता येईल.
100 रू. ते 1 लाखांपर्यंतचा रिचार्ज करता येणे शक्य आहे.

फास्टटॅग लावला नाही तर काय ?

जर फास्टॅगशिवाय एखादी गाडी टोलनाक्यावर आली तर त्या प्रकारच्या वाहनासाठी लागू असणाऱ्या टोलच्या दुप्पट रक्कम भरावी लागेल असे सरकारच्या सूचनेत म्हटले आहे.

कोणती कागदपत्रे लागतील?
फास्टॅग घेण्यासाठी तुम्हाला गाडीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजेच RC, गाडीच्या मालकाचा पासपोर्ट साईझचा फोटो आणि ड्रायव्हिंग लायसन्स लागेल.

सोबतच कागदपत्रांवरील रहिवासी पत्त्याच्या पुरावा म्हणून (Address Proof) आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा व्होटर आयडी दाखवावे लागेल.

जर तुमच्याकडे दोन गाड्या असतील, तर तुम्हाला दोन्ही वाहनांसाठी वेगवेगळे फास्टटॅग घ्यावे लागतील.

एक फास्टॅग 5 वर्षं वैध असेल.
याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही टोलनाक्यापासून 10 किलोमीटरच्या परिघात रहात असाल तर तुम्हाला टोलमध्ये सूट मिळेल.

कॅश बॅकच्या स्वरूपात ही सूट तुमच्या खात्यात जमा होईल.

Comments are closed

error: Content is protected !!