पुणे,दि.१५ ( punetoday9news):- कोरोनाचे कारण देत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती कार्यक्रम सरकारने रद्द केल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्रात लाखो शिवप्रेमी सरकारचे सर्व नियम पाळून धुमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन पूर्ण केलेले आहे. मात्र कोरोना (Covide-19) चे कारण देऊन सरकारने यावर्षी गर्दीचे कारण देऊन ‘शिवजयंती’ कार्यक्रम रद्द करण्यात निर्णय घेतला आहे मात्र संभाजी ब्रिगेडच्या वतीने या काळात अन्य कार्यक्रमासाठी सरकारने परवानगी दिली असल्याची बाब समोर ठेवत ‘शिवजयंती’ लाही परवानगी देण्यात यावी अशी भूमिका घेतली आहे.




मुंबईला बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा अनावरण करायचा होता तेव्हा हजारोंचा जनसमुदाय होता,त्या कार्यक्रमाला राज्य सरकारने परवानगी दिली, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्या स्वागतासाठी, व्यासपीठावर शेकडो नेते, आणि हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता, तेव्हा सरकारला कोरोनाची भीती नव्हती का? धनंजय मुंडे यांच्या स्वागताला परळी येथे हजारोंच्या संख्येने लोकं येतात मग मुख्यमंत्र्यांना हे चालते का?
राष्ट्रवादी काँग्रेसचा जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर संवाद दौरा चालू आहे, पोलिस त्यांना परवानगी देतात… शिवजयंतीला मात्र बंदी घातली जाते. भाजपचे सर्व राष्ट्रीय नेते महाराष्ट्र पश्चिम बंगाल’सह देशभर फिरत आहेत… त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी मिळते मात्र शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी घातली जाते. तसेच काँग्रेस व शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री महाराष्ट्रभर शेकडो लोक घेऊन फिरतात, कार्यक्रम घेतात मात्र पोलिस त्यांना परवानगी देतात आणि सरकार शिवजयंतीच्या कार्यक्रमाला बंदी का घातली जात आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे.

सरकारने काढलेल्या या फतव्यात विरोधात शिवप्रेमी प्रचंड संतापलेला आहे. म्हणून सरकारने शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करून तात्काळ बंदी उठून परवानगी द्यावी.अन्यथा राज्यसरकारला मोठी किंमत मोजावी लागेल,असे संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी मत वेक्त केले.

राज्य सरकारने शिवजयंती कार्यक्रमाला घातलेली बंदीचा निर्णय तात्काळ पाठीमागे घ्यावा व सरसकट परवानगी द्यावी. अन्यथा संभाजी ब्रिगेड च्या स्टाईल ने आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराही संभाजी ब्रिगेड च्या वतीने देण्यात आला.

यावेळी हवेली तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, सरचिटणीस सनी थोपटे,सचिव निलेश ढगे,महिला आघाडी अध्यक्षा मोहिनी रणदिवे, कामगार आघाडीचे रमेश गणगे, वंदना भोसले, स्मिता साबळे,अक्षय जाधव,उपाध्यक्ष रणजित बिरादार, सचिन काकडे, लोकसभा कार्याध्यक्ष दिनकर केदारी अंकुश हाके, हनुमंत गुरव, जयदीप रणदिवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Comments are closed

error: Content is protected !!