३०० वाहनांचा ताफा , रस्त्यावर पसरली दहशत.

पुणे,दि.१६( punetoday9news):- कुख्यात गुंड गजानन मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका झाली या दरम्यान हा गैरप्रकार घडला आहे.  जेलमधून सुटल्यानंतर पुणे-मुंबई द्रुतगतीमार्ग उर्से टोल नाका येथे गर्दी जमवून दहशत पसरवल्याप्रकरणी त्याच्यासह इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी तळोजा कारागृहातून गुंड गजानन मारणे याची सुटका झाली. त्याचे स्वागत करण्यासाठी ३०० पेक्षा अधिक वाहने आणि तरुण जमा झाले होते.




यावेळी तळोजा कारागृह ते पुणे यादरम्यान शक्तीप्रदर्शन करत मारणे याच्या साथीदारांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगा लावल्या होत्या. तसेच द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाका येथे फूड मॉलजवळ मारणे याच्यासह सर्व कार्यकर्ते थांबले होते. त्यांनी आरडाओरडा करत बेकायदेशीर गर्दी जमवून फटाके वाजवले. तसेच, ड्रोनने चित्रीकरण करत दहशतीचे वातावरण निर्मिती केल्याने मारणे याच्यासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!