• दहावी परीक्षा- २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत. तर बारावीची परीक्षा ही २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होईल.
• सोशल मिडिया वर व्हायरल होणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन.
• परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाला छापील स्वरूपात देण्यात आलेले वेळापत्रक अंतिम असेल.
पुणे,दि.१७(punetoday9news):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत तर बारावीची परीक्षा ही २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार आहे.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी परीक्षेच्या तारखा आधीच जाहीर केल्या आहेत. मात्र राज्य मंडळाने विद्यार्थी आणि पालकांसाठी सविस्तर संभाव्य वेळापत्रक www.mahasscboard.in या संकेतस्थळावर जाहीर केले आहे. या वेळापत्रकांबाबत काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या विभागीय मंडळांकडे, राज्य मंडळाकडे २२ फेब्रुवारीपर्यंत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रक माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाला छापील स्वरूपात देण्यात आलेले वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी खातरजमा करून घ्यावी. व्हॉट्सअॅप किंवा अन्य माध्यमातील वेळापत्रक ग्राह्य़ धरू नये, असे डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी सोशल मिडिया वर व्हायरल होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत वेळापत्रक हे शाळेत व महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्राप्त होईल . त्याचबरोबर ते बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असेल.
Comments are closed