• मास्क न वापरणाऱ्या नागरिकांस रु . ५०० / – तसेच रस्त्यावर व सार्वजनीक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांस रु . १००० दंड. 

 

• पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ८ क्षेत्रिय कार्यालये सहाय्यक आरोग्याधिकारी , मुख्य आरोग्य निरिक्षक व आरोग्य निरिक्षक यांना कारवाई करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

पिंपरी,दि.१७ ( punetoday9news):- झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पुणे शहरासहित पुणे जिल्ह्यामध्ये नागरिकांनी नियमांची पायमल्ली करत सर्वत्र कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली होती कागदोपत्री नियमांचे पालन करत असल्याचा बनाव करत कित्येक ठिकाणी सर्रास नियमांचे उल्लंघन होत असल्याने आटोक्यात येत आहे असे वाढलेला कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे.

त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड शहराचे आयुक्त राजेश पाटील यांनी महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करण्याबाबत सक्त सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.

यामध्ये मास्क व सॅनीटायझर वापर सक्तीचा करण्यात आला. असून विना मास फिरणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये मास्क नसलेल्या नागरिकांना ५०० रु. दंड तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांना एक १०००रू.  दंड भरावा लागणार आहे

कोविड -१ ९ च्या प्रसारास पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत खालीलप्रमाणे सुधारित आदेश निर्गमित करण्यात येत आहे.

१ )  शहरातील प्रत्येक नागरिकाने शहरातील कोणतीही सार्वजनिक ठिकाणे , शासकीय व खाजगी कार्यालये याठीकाणी संचार करताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे . २ ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामधील सर्व मंगलकार्यालये , सांस्कृतिक सभागृह , सर्व प्रकारचे सामाजिक , धार्मिक , राजकिय , क्रीडा , मनोरंजन , सांकृतिक , शैक्षणिक उपक्रम , सभा संमेलन व तत्सम मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊ शकतील अशा प्रकारचे कार्यक्रमाचे ठिकाणी सर्व नागरीकांना संचार करताना मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे . आदेशांनुसार उपरोक्त नमुद सर्व ठिकाणी नागरीकांची गर्दी होणार नाही याची संयोजकांनी दक्षता घ्यावी , जेणे करुन कोवीड -१ ९ चा प्रसारास रोखणे शक्य होईल .

३ ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामधील सर्व हॉटेल्स , रेस्टॉरंट , उपहारगृहे इत्यदी ठिकाणी नागरीकांना संचार करताना मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील .

४ ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामधील सर्व मनपा कार्यालये तसेच सरकारी व खाजगी कार्यालयामध्ये मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील .

५ ) या अनुषंगाने मास्क न वापरणाऱ्या नागरिकांस रक्कम रु . ५०० / – व रस्त्यावर व सार्वजनीक ठिकाणी थुकणाऱ्या नागरिकांस रक्कम रु . १००० दंड भरावा लागेल.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!