पुणे,दि.१८( punetoday9news):- पुणे शहरातील पाषाण मधील लमाणतांडा येथे मोठ्या आवाजात सुरू असलेली साऊंड सिस्टीम बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने तुफान दगडफेक करून वाहनाची तोडफोड केली .

दोन दिवसांपुर्वी रात्री दहाच्या सुमारास पाषाण येथील लमाणतांडा भागात हा प्रकार घडला असुन  या दगडफेकीत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे.  याप्रकरणात पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे .

ढेकू भिकू मेघावत ( वय ३८ ) , रामा उर्फ प्रमोद हनुमंत मेघावत ( वय २४ ) हिरामण भीमा राठोड ( वय २ ९ ) लक्ष्मण भीमा राठोड ( वय २५ ) संजय वालिया धानावत ( वय २७ ) , व्यंकटेश मोतीराम खेतावत ( वय २० ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत . त्याशिवाय एकनाथ धनावत व खेमु खेतावत यांच्यासह १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सहायक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!