स्थायी सदस्य निवडीवरून सभागृहात प्रचंड गदारोळ.

पिंपरी,दि.१८(punetoday9news):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीवर भाजपच्या चार, शिवेसना एक आणि राष्ट्रवादीच्या दोन नवीन नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे. सर्वांची नावे आजच्या सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आली.

एक मार्च पासून भाजपाचे संतोष लोंढे, राजेंद्र लांडगे,आरती चोंधे, शितल शिंदे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पंकज भालेकर, मयूर कलाटे तर शिवसेनेचे राहुल कलाटे व अपक्ष झामाबाई बारणे यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे नवीन सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

भाजपकडून भोसरी गटाचे नितीन लांडगे, रवी लांडगे यांना तर चिंचवडच्या गटातील शत्रुघ्न काटे आणि सुरेश भोईर यांना संधी मिळाली आहे. भाजपसोबत संलग्न अपक्ष आघाडीच्या निता पाडाळेंची निवड केली आहे. शिवसेनेकडून मीनल यादव यांना तर राष्ट्रवादीकडून प्रवीण भालेकर आणि राजू बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!