• शिवजयंती सोहळा, आज्ञापत्राचे सामूहिक वाचन.
• भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वीस हजार रुपयांची देणगी.
औध,दि.१९(punetoday9news):- जनता शिक्षण संस्थेच्या शिवाजी विद्यामंदिर औंध प्रशालेत शिवजयंती सोहळा आज्ञापत्राचे सामूहिक वाचन करून शासकीय नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्त्या मनीषा देवकर, सचिन कलापुरे तसेच प्राचार्य विश्वास जाधव, उपप्राचार्य राजू दिक्षित, संस्थेचे कार्याध्यक्ष कांबळे वाय जी, कॉलेज विभागप्रमुख पालवे, सतीश गडचे, सचिन कलापुरे, तालिकोटी, मिनल घोरपडे, अशोक गोसावी उपस्थित होते.
दरवर्षी प्रशालेत शिवजयंती सोहळ्याचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते परंतु यावर्षी कोरोना प्रभाव असल्यामुळे शासकीय नियमांचे पालन करून सामाजिक अंतर ठेवून विद्यार्थ्यांनी शिवकालीन आज्ञापत्राचे वाचन करून अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली. यातून शिवरायांचे विथचार आचरणात यायला हवे फक्त बाह्य देखाव्या पेक्षा शिवरायांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करून त्याचे दैनंदिन जीवनात अनुकरण करणे आजच्या काळात अत्यंत गरजेचे आहे. मंदिरावरील शिखर हे दिसायला सुंदर असले तरी त्याखाली हजारो दगड,वीट व कारागीरांची मेहनत खर्च झालेली असते . त्याचप्रमाणे प्रचंड कष्ट व जिद्दीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी यशाचे उंच शिखर गाठायचे आहे. त्यासाठी शिवाजी महाराजांची आज्ञापत्रे एक आदर्श बौद्धिक मार्ग आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मनीषा देवकर यांनी प्रशालेस भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे वीस हजार रुपयांची देणगी देऊन प्रशालेविषयीच दातृत्व दाखवून दिले.
शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन आपण काम करूया असे उपप्राचार्य राजू दिक्षित यांनी प्रास्ताविकेत सांगितले. प्राचार्य विश्वास जाधव यांनी शिवाजी महाराजांची कार्यशैली,शासनपद्धती या विषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र लगड यांनी केले आणि आभार बिपीन बनकर यांनी मानले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
विडिओ बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Comments are closed