पिंपळे गुरव,दि. १९(punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव मध्ये जवळकरनगरमधील पारिजात कॉलनी येथे आरोग्य सहकार संस्था आणि पारिजात कॉलनी रहिवाशी संघातर्फे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर व  महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर यांच्या हस्ते करण्यात आले. २०५ जणांनी या शिबिराचा लाभ घेतला. हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. महिलांना भेटवस्तु आणि तिळगुळ वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका वैशाली जवळकर, नगरसेविका उषा मुंढे, नगरसेवक शशिकांत कदम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन सुभाष पालांडे, नागसेन पालवे, बाळू हिंगे, अनिल चौगुले, गोरक्षनाथ राक्षे, हिरामण देवरे, लक्ष्मण पाटील, जनार्धन तरकसे, विलास गायकवाड, मधुकर सोनावणे, संजय बुरके, अरविंद मरळ, अमोल पाटील यांनी केले.

 

Comments are closed

error: Content is protected !!