पुणे,दि.१९( punetoday9news):- संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त खराडी येथील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तसेच माहेर संस्था आव्हाळवाडी येथे फळ वाटप करून मोठ्या जल्लोषात, शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.

खराडीे येथील कार्यालयात उद्योजक तानाजी जगताप व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले, तसेच माहेर संस्था आव्हाळवाडी येथील ज्येष्ठ पुरुषांना व महिलांना फळ वाटप करण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष रामेशमामा गणगे, प्रविण आव्हाळे, सरचिटणीस सनी थोपटे, जिल्हा कार्याध्यक्ष साजिद सय्यद, महिला अध्यक्षा मोहिनी रणदिवे, मावळ लोकसभा कार्याध्यक्ष दिनकर केदारी, संघटक विठ्ठल सुर्यवंशी, हवेली तालुकाध्यक्ष शिवाजी पवार यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा सचिव निलेश ढगे, जिल्हा उपाध्यक्ष रणजित बिरादार, जोती पेंढारकर, स्मिता साबळे, हवेली तालुका सरचिटणीस जयदीप रणदिवे,आप्पा चंदनशिवे, हनुमंत गुरव, अंकुश हाके, मंगेश बिरादार,सचिन सुरवसे, जितेंद्र गायकवाड, गौतम चौधरी, अशोक फजगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Comments are closed

error: Content is protected !!