सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील घरगुती गॅसची चोरी करणारे तब्बल २२ आरोपी अटकेत.
परिसरातील ग्राहकांच्या प्रचंड तक्रारी, कारवाईने दिलासा.
सांगवी,दि.२०( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी व पिंपळे गुरव परिसरात घरगुती गॅसची चोरी करणाऱ्या टोळीला सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई करत अटक केली आहे.
याप्रकरणी एकूण २२ जणांना ताब्यात घेण्यात आले असून ही कारवाई आज सांगवी परिसरात करण्यात आली आहे.
कारवाईमध्ये एकूण ३८१ गॅसच्या रिकाम्या आणि भरलेल्या टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. संबंधित आरोपी हे भैरवनाथ गॅस एजन्सी आणि कांकरिया गॅस एजन्सीमधील कर्मचारी असल्याचे समोर आले असून २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या घरगुती गॅसची चोरी करणाऱ्या टोळीला सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी एकूण २२ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून ही कारवाई आज सांगवी परिसरात करण्यात आली आहे.
कारवाईमध्ये एकूण ३८१ गॅसच्या रिकाम्या आणि भरलेल्या टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. संबंधित आरोपी हे भैरवनाथ गॅस एजन्सी आणि कांकरिया गॅस एजन्सीमधील कर्मचारी असल्याचे समोर आले असून २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरातून घरगुती गॅसची चोरी करणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ३८१ घरगुती गॅस हस्तगत करण्यात आले आहेत. मुख्य गोडाऊनमधून इतर दुसऱ्या गोडाऊनमध्ये गॅस सिलेंडर नेऊन तिथे कनेक्टरच्या सहाय्याने एका सिलिंडरमधून १ ते २ किलो गॅस दुसऱ्या रिकाम्या सिलेंडरमध्ये भरायचे.” व पुन्हा, ते गॅस ग्राहकांना विकायचे. हे सर्व सांगवी परिसरातील भैरवनाथ गॅस आणि कांकरिया गॅस एजन्सी मधील कर्मचारी आहेत. त्याच्याकडून १४ टेम्पोमध्ये ३८१ गॅसच्या भरलेल्या आणि रिकाम्या टाक्या सामाजिक सुरक्षा पथकाने ताब्यात घेतल्या आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक सिसोदे व पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Comments are closed