अभिनेते पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान.
चऱ्होली,दि.२३(punetoday9news):- महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक संस्था व व्यक्ती यांना हेल्पिंग हँडस सोसायटी ठाणे यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय नवरत्न सन्मान पुरस्कारासाठी दिघीतील स्नेहछाया सामाजिक प्रकल्पाची निवड झाली आहे.
आदित्य मंगल सभागृह, डोंबिवली येथे हेल्पिंग हँडस सोसायटी ठाणे आयोजित राज्यस्तरीय नवरत्न सन्मान पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर , मराठी विनोदी अभिनेते पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन स्नेहछाया प्रकल्पाच्या वतीने परिवाराचे सदस्य सचिन जैतापकर यांनी सन्मानपूर्वक स्वीकारला. सोहळ्याला स्नेहाछाया परिवाराचे सदस्य हनुमंत गलांडे , बारक्या भोईर उपस्थित होते.
मिळालेला पुरस्कार रुपी कौतुकाची थाप नक्कीच स्नेहछाया सामाजिक प्रकल्पाच्या सेवाकार्यास ऊर्जा व स्फुर्ती देणारी आहे. सुरुवातीपासून आजपर्यंतच्या अविरत सेवा कार्यांत लोक सहभाग महत्वाचा असल्याने हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून सर्व स्नेहाछाया परिवाराचा असल्याचे प्रांजळ मत स्नेहाछाया सामाजिक प्रकल्पाचे संचालक प्रा. दत्तात्रय इंगळे व माई सारिका इंगळे यांनी यावेळी व्यक्त केले.
Comments are closed