पुणे,दि.२३( punetoday9news):- मामासाहेब मोहोळ महाविद्यालय,पौडरोड महाविद्यालयाच्या स्त्री अभ्यास केंद्रामार्फत दि.१० फेब्रुवारी २०२१ ते १६फेब्रुवारी २०२१ पर्यंत ‘विवाहपूर्व समुपदेशन काळाची गरज ‘ या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. 

यामध्ये विद्यार्थिनींना सोशल मीडियाचा वापर करून समुपदेशक स्मिता जोशी, डॉ.सागर पाठक, अंजली रासने, वंदना देशपांडे इत्यादी तज्ञ मार्गदर्शकांचे ऑडिओ- व्हिडीओ दाखवण्यात आले व समूहचर्चा पद्धतीचा वापर करून विद्यार्थिनींना आठवडाभर ऑनलाईन समुपदेशन करण्यात आले. या व्याख्यानमालेमध्ये ‘विवाहपूर्व समुपदेशन काळाची गरज’, ‘बदलत्या काळात पालकांच्या समुपदेशनाची गरज’, ‘नात्यातील तणांवांचे व्यवस्थापन’, ‘नात्यातील गोडवा कसा जपावा’, ‘स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे’, ‘विवाहाला सामोरे जाताना मानसिक तयारी ची गरज’ अशा विविध विषयांवर विद्यार्थिनींना मार्गदर्शन मिळाले. त्याच बरोबर मुंबई सायबर क्राईम हेड ब्रांच सीनिअर पीआय कुमुद कदम ज्यांच्यावर महिला अत्याचार विभागाची अतिरिक्त जबाबदारी आहे. अशा महत्त्वपूर्ण महिला अधिकाऱ्याने ‘सोशल मीडियाचा वापर आणि मुलींची होणारी फसवणूक’ या विषयावर ऑनलाइन प्लॅटफॉर्म वरती विद्यार्थिनींना बहुमोल मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी संपूर्ण व्याख्यानमाला आयोजित करण्यासाठी प्रोत्साहन दिले. व्याख्यानमालेचे संयोजन स्त्री अभ्यास केंद्राच्या संयोजिका डॉ.रूपाली शेंडकर आणि डॉ. स्वाती शिंदे यांनी केले या संपूर्ण उपक्रमात ८१ विद्यार्थिनींनी आपला सहभाग घेतला.
व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी सर्व महिला प्राध्यापकांनी सहभाग घेऊन सहकार्य केले.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!